या मांसाहारी पदार्थात व्हिटॅमिन बी12 चं प्रमाण सर्वाधिक, जाणून घ्या
3 जून 2025
Created By: राकेश ठाकुर
व्हिटॅमिन बी12 एक आवश्यक पोषक घटक आहे. यामुळे मज्जासंसख्या, लाल रक्तपेशी आणि डीएनए बनवण्यास मदत होते. याची उणीव असल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात.
व्हिटॅमिन बी 12 ची उणीव असल्यास अशक्तपणा जाणवू शकतो. शिवाय हाडांमध्ये कमकुवतपणा, लक्ष केंद्रीत न होणे आणि मानसिक समस्या उद्भवू शकते.
शरीरातील व्हिटॅमिन बी12 ची उणीव दूर करणं गरजेचं आहे. ही उणीव पूर्ण करण्यासाठी मांसाहार फायदेशीर ठरतो. चला जाणून घेऊयात
आहारतज्ज्ञ अनामिका गौर यांच्या मते, सॅल्मन माशामध्ये व्हिटॅमिन बीचं प्रमाण सर्वाधिक आहे. हा मासा पोषक तत्त्वांनी भरलेला आहे.
सॅल्मन माशात ओमेगा 3 फॅटी एसिड असते. यातील ईपीए आणि डीएचए रक्तदाब नियंत्रित करतात. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.
सॅल्मन माशात बी6, नियासिन आणि रिबोफ्लेविन असते. यामुळे उर्जेची पातळी वाढण्यास मदत होते. मेंदू आणि मज्जासंस्था निरोगी ठेवते.
या माशातील व्हिटॅमिन ए दृष्टी सुधारण्यास मदत करते. स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रीत करण्याची पातळी सुधारते.
दुधात मनुके भिजवून खाणं महिलांसाठी आरोग्यवर्धक, का ते जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा