केळी हे नाश्त्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. कारण ते पोषक तत्वांचे भंडार आहे. 

19 July 2025

केळीत साखर, पोटॅशियम आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे केळी खाल्ल्याने त्वरित उर्जा मिळते.

केळीतून चांगली एनर्जी मिळत असली तरी रिकाम्या पोटी केळी खाऊ नये. डायटिशियन गरिमा गोयल यांनी यासंदर्भात माहिती दिली.

रिकाम्या पोटी केळी खाल्यानंतर शरीरातील मॅग्नीशियम आणि कॅल्शियम वाढू शकते. त्यामुळे अ‍ॅसिडीटी होण्याचा धोका असतो.

केळीत नैसर्गिक साखर असते. यामुळे रिकाम्या पोटी सेवन केल्यामुळे साखरेची पातळी वाढते. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हे घातक आहे. 

केळीमध्ये असलेले ट्रिप्टोफॅन आणि उच्च मॅग्नेशियममुळे झोप आणणारे हार्मोन्स सक्रिय होतात. त्यामुळे तंद्री जाणवू शकते. 

रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने काही लोकांना पोटफुगीची समस्या होऊ शकते. कारण केळीमध्ये भरपूर स्टार्च असते, जे लवकर पचत नाही.

केळीत मॅग्नीशियम आणि पोटॅशियम असते. त्यामुळे रिकाम्या पोटी खाल्यामुळे रक्तप्रवाहात मिनरल्स वाढतात. यामुळे असंतुलन निर्माण होते. किडनीचा आजार असलेल्या लोकांनी रिकाम्या पोटी केळी खाऊ नये.  

सकाळी नाश्त्यात तुम्ही ओट्स, दही किंवा सुक्या मेव्यांसोबत केळी खाऊ शकता. तसेच जिम जाण्यापूर्वीही केळी खाऊ नये.