15 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
डेंग्यू हा विषाणूजन्य संसर्ग आहे. एडिस डासाच्या चाव्यामुळे होतो. साचलेल्या पाण्यात याची पैदास वेगाने होते.
डेंग्यूमुळे शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वेगाने कमी होते. रक्तस्राव होण्याचा धोका वाढतो. गंभीर प्रकरणात शॉक सिंड्रोम किंवा हेमोरेजिक ताप देखील होऊ शकतो.
डेंग्यू झाल्यानंतर शरीरात अनेक लक्षणं दिसून येतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. चला जाणून घेऊयात..
डॉ. सुभाष गिरी यांच्या मते, डेंग्युमुळे अचानक उच्च ताप येतो. 104 पर्यंत तापाची पातळी पोहोचू शकते. अंग थरथरणे आणि थंडी वाजणं सामान्य आहे.
डेंग्यूला 'ब्रेकबोन फिव्हर' असंही म्हणतात. कारण यामुळे शरीरातील हाडे तुटल्यासारखं वाटतं. पाठ, कंबर, हात, पाय आणि सांध्यामध्ये तीव्र वेदना होतात.
रुग्णाला थकवा, सुस्ती आणि अशक्तपणा जाणवतो. कधी कधी बरे झाल्यानंतरही अशक्तपणा अनेक दिवस टिकून राहतो.
पाणी साचू देऊ नका, मच्छरदाणी आणि प्रतिबंधक औषधं वापरा. ताप आल्यावर वेळेत रक्त तपासणी करा.