हाडांचा विषय जेव्हा येतो, तेव्हा सर्वांना दूध आठवते. पालक मुलांना हाडे मजबूत करण्यासाठी लहानपणापासून दूध देत असतात.

17 July 2025

दुधात मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते. तसेच त्यात अन्य पोषक तत्वही असतात. त्यामुळे हाडे मजबूत करतात.

दूध सुपरफूड आहे. त्यात तुम्ही ड्रायफ्रूट मिक्स केल्यावर हाडे लोखंडासारखी मजबूत होतील. हे ड्रायफ्रूट बदाम आहे. 

बदाममध्ये व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, फायबर, प्रोटीन, मॅग्नेशियम आणि पोटेशियम असतात. हे घटक आपली हाडे मजबूत करण्याबरोबर आरोग्यासाठी फायदेशीर असतात. 

रात्रभर बदाम दुधात भिजवून सकाळी सेवन करा. त्यामुळे पचनक्रिया चांगली होईल. 

दुधात मिक्स केल्यावर बदामची पोषक तत्व वाढतात. दूध आणि बदाम वेगवेगळे खाण्यापेक्षा या पद्धतीने घेतल्यास जास्त एनर्जी देतात.

दूध आणि बदामचे कॉम्बिनेशन ह्रदयासाठी फायदेशीर आहे. बदामातील फायबर आणि फॅट्स दुधात मिक्स झाल्यावर ह्रदय चांगले काम करते.