महिलांसाठी वरदान आहेत सुर्यफुलाच्या बिया, जाणून घ्या फायदे

26  July 2025

Created By: Shweta Walanj

सूर्यफूलाच्या बियांमध्ये हेल्दी फॅट्स असतात, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतात आणि हृदय विकारांचा धोका कमी करतात.

 बियांमध्ये व्हिटॅमिन E भरपूर प्रमाणात असते, जे त्वचेचे संरक्षण करते, वृद्धत्वाचे लक्षणे कमी करते.

सूर्यफूलाच्या बियांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते, जे स्त्रियांच्या हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त असतात.

बियांमध्ये झिंक व सेलेनियमसारखे खनिज घटक आहेत, जे हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करतात आणि मासिक पाळीच्या समस्यांवर नियंत्रण ठेवतात.

मॅग्नेशियममुळे सूर्यफूलाच्या बिया तणाव, चिडचिड व मानसिक थकवा कमी करण्यात मदत करतात.

सूर्यफूलाच्या बियांमधील फॉलिक अ‍ॅसिड स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेसाठी महत्त्वाचे आहे, तसेच गर्भधारणेसाठी उपयुक्त ठरते.