27 April 2026

सकाळी रिकाम्या पोटी हे पदार्थ खाण्याचे मोठे फायदे...

सकाळी रिकाम्या पोटी काही पदार्थ खाल्ल्याने शरीराला अनेक लाभ मिळतात.अनेक आजारांना लांब ठेवता येते.

कोमट पाणी आणि लिंबू - लिंबूत सायट्रिक एसिड असते. ते शरीराच्या पीएच लेव्हलला संतुलित करते.लिव्हरला डिटॉक्स करण्यास मदत करते.

 भिजवलेले बदाम - बदाम भिजवल्याने त्यातील टॅनिन निघून जाते. ज्यामुळे याचे पोषक तत्व सहज शोषले जातात.

भिजवलेले मेथीचे दाणे - मेथीत सोल्युबल फायबर आणि गॅलॅक्टोमॅनन असते. जे ब्लड शुगरची पातळी नियंत्रित करते आणि पचन सुधारते

भिजवलेले चिया सीड्स - चिया सिड्समध्ये फायबर, प्रोटीन आणि ओमेगा-३ फॅटी एसिड्स असतात. जे हळूहळू ऊर्जा देतात.

कोमट पाण्यात मध - मधात एंटीऑक्सीडेंट्स आणि एंजाईम्स असतात. जे शरीराला डिटॉक्स करतात आणि इम्युनिटी वाढवतात.याने मेटाबॉलिझ्म वेगाने होते.

भिजवलेले अक्रोड - अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी एसिड आणि मेलनटोनिन असते. जे ब्रेन आणि हार्ट हेल्थला सपोर्ट करतात.यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते.

आवळा ज्यूस - आवळ्यात व्हिटामिन्स सी  आणि एंटीऑक्सीडेंट्स असतात. जे लिव्हर आणि इम्युन सिस्टीमला मजबूत करतात.