पोटॅशियम असलेले हे पदार्थ हृदयासाठी चांगले, आहारात समावेश करा
Created By: Atul Kamble
23 March 2026
पोटॅशियम हे ब्लडप्रेशर नियंत्रित करण्यात महत्वाची भूमिका निभावते. पोटॅशियमचा आहारात समावेश करा
पोटॅशियम रिच फूडने उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते. स्नायू आखडणे देखील यामुळे बंद होते. हाडांसाठी देखील चांगले असते.
पोटॅशियम रिच फूड्समध्ये केळी महत्वाची असतात.याचे सेवन केल्याने हृदयाला फायदा होतो. रोज दोन केळी खाऊ शकता.
पोटॅशियमच्या पूर्ततेसाठी सोयाबिन, सोयाबिनचे दूध आणि टोफूचा समावेश आहारात करु शकता. युएसडीएमध्ये दिलेल्या डेटानुसार १०० ग्रॅम सोयाबिनमध्ये ५१५ मिलीग्रॅम पोटॅशियम मिळते.
रोज दोन ताजे जर्दाळू खाल्ल्याने ४ टक्के पोटॅशियमचा पुरवठा होऊ शकतो.
संत्र्यांमध्ये केवळ व्हिटामिन्स सी नसते तर यात पोटॅशियमचे प्रमाण देखील चांगले असते.
युएसडीएच्या मते १०० ग्रॅम रताळ्यात ४७५ मिलीग्रॅम पोटॅशियम असते.