या भाज्या कच्च्या खाऊ नयेत, अन्यथा होईल नुकसान

Created By: Atul Kamble

7 April 2026

 वेगवेगळ्या रंगाच्या भाज्यांचा आहारात समावेश केल्यास तब्येत चांगली होते. कारण भाज्यात चांगली जीवनसत्वे असतात.

 सलाड, सँडविचमध्ये नेहमीच कच्च्या भाज्यांचा वापर होतो. कारण शिजवल्यानंतर काही पदार्थांचे गुणधर्म नष्ट होतात. मात्र काही भाज्यांना कच्चे खाणे आरोग्यास हानिकारक असते.

कोबीचा वापर सलाडमध्ये काहीजण करतात.कोबीच्या लागवडीसाठी किटकनाशके जास्त वापरली जातात.यात ई.कोलाई आणि सॅल्मोनेला देखील असतात. त्यामुळे कोबी कच्ची खाऊ नये.

सलाडमध्ये बिट वापरले जाते. हे हेल्दी भाजी असते. मात्र, जमिनीच्या खाली उगवणाऱ्या या भाजीत हेव्ही मेटल्स आणि पेस्टीसाईड असतात.त्यामुळे ही भाजी हलकी वाफवून खा.

 लोक बटण मशरुमला सँडविचमध्ये कच्चे वापरतात. मात्र, ते सेवन केल्यास पचत नाही. तसेच यात विषाक्त घटक असू शकतात. म्हणून ते शिजवून खावेत

लोक सिमला मिरची कच्ची सँडविचमध्ये वापरतात.सिमला मिरचीला गरम पाण्यात धुवून खावे.

 पालकमध्ये आयर्न असते. पालक कच्ची खाणे योग्य नाही.यात ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते.ऑक्सलेटमुळे किडनी स्टोन होऊ शकतो.

स्प्राऊट म्हणजे मोड आलेले कडधान्य कच्चे खाऊ नये. यातही ई.कोलाई आणि सॅल्मोनीला सारखे बॅक्टेरिआ असतात.त्यामुळे ते वाफवूनच खावेत.