25 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
यूरिन टेस्टच्या माध्यमातून लघवीचे सँपल घेऊन शरीरातील बदल आणि आजारांची तपासणी केली जाते. ही सोपी आणि वेदनारहीत तपासणी आहे.
डॉ. सुभाष गिरी यांच्या मते, रुटीन हेल्थ चेकअपमध्ये यूरिन टेस्ट शरीराच्या स्थितीची माहिती देते. अनेक आजारांची सुरुवातीलाच माहिती मिळते.
यूरिन टेस्टमुळे मूत्रपिंडाच्या आरोग्याची माहिती मिळते. क्रिएटिनिन, प्रोटीन आणि टॉक्सिक पदार्थांची मात्रा यातून कळते. मूत्रपिंड व्यवस्थित काम करते की नाही ते कळते.
युरिन टेस्टमुळे लघवीत बॅक्टेरिया, वाइट ब्लड सेल्स किंवा नायट्रेट्स आहे नाही ते कळते. यांचं वाढणं युरिनरी ट्रॅक्ट इंफेक्शनचे संकेत देते. लगेच उपचार सुरु करणं भाग आहे.
युरिनमध्ये ग्लूकोज आणि कीटोन्सची मात्रा डायबिटीज किंवा ब्लड शुगर असंतुलित असल्याची माहिती मिळवण्यास मदत करते.
गर्भधारणेत युरिन टेस्टमुळे प्रोटीन, शुगर आणि इंफेक्शनची माहिती देते. यामुळे आई आणि मुलाच्या तब्येतीकडे लक्ष ठेवता येते.
युरिनच्या रंग आणि घटकांमुळे लीवर आणि मेटाबॉलिझमशी निगडीत आजारांची माहिती मिळते. यामुळे शरीरातील केमिकल बॅलेंसची माहिती मिळते.