व्हीटग्रासचा ज्यूस प्यायल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात? जाणून घ्या
7 जून 2025
Created By: राकेश ठाकुर
व्हीटग्रासमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हा रस प्यायल्याने आरोग्यावर चांगले परिणाम होतात, असं तज्ज्ञ सांगतात.
व्हीटग्रास आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. यात ए, बी, सी, ई आणि के जीवनसत्वे आहेत.
व्हीटग्रासमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फायटोन्यूट्रिएंटन्स, 17 अमिनो आम्ल, क्लोरोफिल आणि प्रथिने भरपूर प्रमाणात आहेत.
व्हीटग्रासमध्ये भरपूर प्रमाणात एंजाइम असल्याने शरीराला पोषक तत्वे शोषून घेण्यास मदत करते.
व्हीटग्रास रसामुळे पचनसंस्था सुधारते. डीटॉक्स प्रभावामुळे आतडे स्वच्छ होते. गॅस, पोटफुगी आणि अपचनापासून दिलासा मिळतो.
चयापचय सुधारल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यामुळे पोट भरल्यासारखं राहतं. तसेच बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.
लाल रक्तपेशी, हिमोग्लोबिन आणि पांढऱ्या रक्तपेशी वाढवण्यास मदत करते. हाडं मजबूत होतात.
दुधात मनुके भिजवून खाणं महिलांसाठी आरोग्यवर्धक, का ते जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा