पोटाच्या कॅन्सरची काय असतात लक्षणे ?

20 November 2025

Created By: Atul Kamble

पोटाच्या कॅन्सरला गॅस्ट्रीक कॅन्सर म्हणतात. पेशींची अमर्याद वाढ झाल्याने तो होतो. या पेशी ट्युमर तयार करतात. त्याचे रुपांतर कॅन्सरमध्ये होते.

पोटात कॅन्सरझाल्याची अनेक लक्षणे आहेत त्याकडे दुर्लक्ष करुन नये

डॉ.सुभाष गिरी यांच्या मते पोटात बऱ्याच काळापासून जळजळ किंवा अपचनाची समस्या होत असेल तर दुर्लक्ष करु नका ते कदाचित कॅन्सरचे लक्षण असू शकते.

थोडेसे खाल्ल्याने लागलीच पोट भरल्यासारखे वाटणे हे देखील पोटाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.

विना कारण वजन घटणे, याशिवाय भूक न लागणे, हे देखील कॅन्सरचे लक्षण असू शकते.

 पोटाच्या वरच्या भागात दुखणे. हे दुखणे जेवल्यानंतर वाढणे हे देखील कॅन्सरचे लक्षण असू शकते

जेवल्यानंतर उलटी येत असेल आणि उल्टीतून रक्त येत असेल तर हे देखील कॅन्सरचे लक्षण असू शकते.