मूत्रातून रक्त येणे हे कोणत्या आजाराचं लक्षण आहे?
30 मे 2025
Created By: राकेश ठाकुर
लघवी करताना जेव्हा रक्त दिसतं ते गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. नेमकं काय ते जाणून घ्या.
डॉ. सुभाष गिरी यांच्या मते, हा संसर्ग महिलांमध्ये सामान्यपणे आढळतो. पण पुरुषांमध्येही होऊ शकतो. संसर्ग बॅक्टेरियामुळे होतो.
मूत्रपिंडात मिनरल्स जमा झाल्याने खडे तयार होतात. यामुळे मूत्रमार्गात खरचटू शकतं आणि त्यामुळे रक्तस्राव होऊ शकतो. लवघवी करताना वेदना होतात.
मूत्रपिंडात कोणतीही अंतर्गत दुखापत किंवा संसर्ग असल्यास रक्त येऊ शकतं. हे दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या आजाराचे लक्षण असू शकते.
मूत्रमार्गात रक्त येणं हे प्राथमिक कर्करोगाचे लक्षण असू शकतं. लघवी करताना जळजळ होते आणि वजन कमी होते.
वय वाढताना पुरुषांमध्ये ही स्थिती दिसून येते. प्रोटेस्ट ग्रंथीचा आकार वाढल्याने मूत्रप्रवाहावर दबाव येतो आणि रक्तस्राव होऊ शकतो.
मूत्रपिंडात ट्यूमर किंवा संसर्ग असेल तर रक्तस्राव होऊ शकतो. यामुळे पाठदुखी, थकवा, तसेच वजन कमी होतं.
घरात आरसा कुठे लावला पाहीजे? जाणून घ्या वास्तुशास्त्र
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा