शरीरात व्हिटॅमिन सी कमी असल्यास काय होतं? जाणून घ्या लक्षणं
11 जून 2025
Created By: राकेश ठाकुर
व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडेंटसारखं काम करतं. यामुळे शरीरातील सेल्स व्यवस्थित राहतात. तसेच रोगप्रतिकार शक्तीही वाढते. आयर्न अब्झॉर्प्शन आणि कोलेजन वाढवण्यास मदत करते.
व्हिटॅमिन सी कमी असल्यास दीर्घकालीन स्कर्वी आजार होऊ शकतो. हाडं आणि स्नायूंमध्ये कमकुवतपणा जाणवतो. त्वचा रोग आणि अशक्तपणा जाणवतो.
शरीरात व्हिटॅमिन सीची उणीव असल्यास अनेक लक्षणे दिसून येतात. याकडे दुर्लक्ष करू नये. चला जाणून घेऊयात.
डॉ. सुभाष गिरी स्पष्ट करतात की, व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे शरीरात कोलेजन तयार होते. यामुळे त्वचा नाजू होते आणि थोडी दुखापत झाली तर निळे डाग पडतात.
शरीराला सतत थकवा जाणवतो आणि काम करण्याची इच्छा राहात नाही. कारण व्हिटॅमिन सी उर्जेची पातळी वाढवते.
व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे हिरड्यांच्या नसा कमकुवत होतात. यामुळे सूज आणि रक्तस्राव होऊ शकतो. दात सैल होऊ लागतात किंवा पडतात.
शरीरात व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे कोलेजनची पातळी कमी होते. यामुळे गुडघे, घोटे आणि कोपराला सूज येते.
किंग कोब्राने गिळला चाकू! दोन जणांनी जीवाची पर्वा न केलं असं Video