उन्हाळ्यात लिंबू पाण्यात डिंक टाकून प्यायल्यास काय होतं?
16 मे 2025
Created By: राकेश ठाकुर
उन्हाळ्यात अंगाची काहिली होते. शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. यामुळे लिंबू पाण्यात डिंक टाकून प्यायल्यास शरीराला फायदे होतात.
उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होते. लिंबू, पुदीना आणि डिंक मिश्रित रस प्यायल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.
लिंबात व्हिटॅमिन सी असतं. यात डिंक टाकल्यास रोगप्रतिकारशक्ती तर वाढते त्यासोबत डिटॉक्सिफिकेशन होण्यास मदत होते.
अँटीऑक्सिडेंट बाहेर पडल्याने वजन कमी होण्यास मदत होते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी हे पेय रोज सकाळी रिकामी पोटी प्यावं.
उन्हाळ्यात पोटात दुखणं, बद्धकोष्ठता आणि पोटफुगीची समस्या असल्यास या पेयामुळे आराम मिळतो.
लिंबू, पुदिना आणि डिंक एकत्रित करून प्यायल्यास त्वचा तजेलदार होते. तसेच मुरूमे, सुरकुत्यांपासून आराम मिळतो.
उन्हाळ्यात एकदम सुस्त वाटतं. यामुळे ऊर्जा टिकवून ठेवण्यास उपयुक्त ठरतं. या पेयात पोषक घटक असून ऊर्जा मिळते.
तुर्कीच्या झेंड्यातील लाल रंगात कोणाचं रक्त?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा