तुळशीच्या बिया पाण्यात भिजवून प्यायल्यास काय होतं?

5 मे 2025

Created By:  राकेश ठाकुर

तुळस ही औषधी वनस्पती असून तिचा वापर घरगुती उपचारांसोबत औषधं बनवण्यासाठी उपयोग होतो. याच्या बियादेखील आरोग्यवर्धक असतात. 

उन्हाळ्यात या बियांचं सेवन केल्याने थंडावा मिळतो. तुळशीच्या बियांमध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं.

तुळशीच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह असतं. तसेच फ्लेव्होनॉइड्स, पॉलीफेनॉल आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात.

तुळशीच्या बिया काही वेळ पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर या बिया मिसळून पेय बनवा. यामुळे उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळेल. 

तुळशीच्या बिया पाण्यात भिजवून सेवन केल्याने पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे भूक लागत आणि वजन नियंत्रणात राहतं. 

तुळशीच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी एसिड असतं. यामुळे मेंदुला चालना मिळते. तसेच स्मरणशक्ती मजबूत राहते.

तुळशीच्या बियांचं सेवन केल्याने रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित होतं. हृदयाचे आरोग्य सुधारण्यात मदत होते. 

मधुमेहींसाठी बिया सेवन करणं फायदेशीर आहेत. यामुळे रक्तातील साखरेचं नियंत्रण होतं.

साप की मुंगूस! पळण्यात कोण सर्वात आघाडीवर? कोण जिंकणार?