किडनी स्टोनचं सर्वात मोठं लक्षण कोणतं?

13 मे 2025

Created By:  राकेश ठाकुर

मूत्रपिंडाच्या वेदनांची अनेक लक्षणं आहेत. यात पाठीच्या खालच्या भागात किंवा बाजूला वेदना होते. लघवीत रक्त येणे, मळमळ, उलट्या आणि ताप येणे याचा समावेश आहे. 

किडनी स्टोनचं सामान्य लक्षण म्हणजे पाठीच्या खालच्या भागात किंवा पोटाच्या खालच्या भागात तीव्र वेदना होतात.

स्टोनमुळे मूत्र विसर्जित करताना रक्त येऊ शकतं. सहसा गुलाबी, लाल किंवा तपकिरी रंगाची लघवी होऊ शकते.

स्टोनमुळे पोट बिघडू शकतं आणि उलट्या होऊ शकतात.

स्टोनमुळे संसर्ग झाल्यास ताप येऊ शकतो. तुम्हाला वारंवार ताप येत असल्याचं जाणवेल.

थंडी वाजणे हे देखील किडनी स्टोनचं लक्षण आहे. पीडित व्यक्तीला नेहमीच थंडी जाणवते. 

स्टोनमुळे वारंवार लघवी करण्याची इच्छा होऊ शकते. लघवी करताना त्रास होऊ शकतो. 

पाण्यात तरंगणारा की बुडणारा! केमिकलने पिकवलेला आंबा कोणता? जाणून घ्या