पाण्यात तरंगणारा की बुडणारा! केमिकलने पिकवलेला आंबा कोणता? जाणून घ्या

12 मे 2025

Created By:  राकेश ठाकुर

बाजारात उपलब्ध असलेले आंबे नैसर्गिकरित्या पिकवलेत की कार्बाइडचा वापर करून हे आज आपण समजून घेऊयात

कृत्रिमरित्या आंबे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर केला जातो. नैसर्गिक किंवा रसायन वापरून पिकवलेले आंबे पाण्यात टाकून तपासता येतात. 

नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा पाण्यात टाकली की बुडतो. तर कृत्रिमरित्या पिकवलेला आंबा पाण्यात तरंगतो. 

नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याला एक सुगंध असतो. तर कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंबा सुगंध देत नाही. त्याला रसायनाचा वास येतो. 

नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा आतून पिकतो. तर बाहेरून कठीण असतो. पण कृत्रिमरित्या पिकवलेला आंबा बाहेरून पिवळा असतो आणि थोडा मऊ असतो.

नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्यांच्या आतला रंग सारखाच असतो. पण रासायनिक पद्धतीने पिकलेल्या आंब्यांच्या सालीचा रंग वेगवेगळा असू शकतो. 

कृत्रिमरित्या पिकवलेला आंबा लवकर खराब होतो. दोन्ही आंब्यांमधील फरक आपण समजू शकतो. 

कोणता मंत्र तुमचे भाग्य बदलू शकतो?