लिव्हर शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. जो औषधांवर प्रक्रिया करण्याचेही काम करतो. जास्त औषधाने त्याच्यावर दबाव येतो आणि क्षमता प्रभावित होऊ शकतो.
अधिक औषधांचे सेवन केल्यास लिव्हरला त्यांचे पचन करुन त्यांना बाहेर काढण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे लिव्हरवर दबाव वाढतो.त्याची क्षमता कमी होते.
सतत औषधे घेतल्याने लिव्हरच्या पेशींचे नुकसान होऊ शकते. ही स्थिती लिव्हर डॅमेज किंवा लिव्हर फेल्युअरपर्यंत जाऊ शकते. ज्यामुळे जीवाला धोका निर्माण होतो.
काही औषधे जास्त घेतल्याने लिव्हरमध्ये फॅट जमा होते. त्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या होऊ शकते. त्यामुळे काळासोबत लिव्हरचे कार्य बिघडते.
जास्त औषधांचा लिव्हरच्या एंजाईम्सच्या स्तरावरही परिणाम होतो.याच्या वाढण्याने संकेत मिळतो की लिव्हरवर दबाव आहे. आणि ते नीट कार्य करु शकत नाही.
लिव्हर कमजोर झाल्याने पचन यंत्रण प्रभावित होते. यामुळे भूक कमी लागणे, गॅस, अपचन आणि थकवा असा समस्या निर्माण होतात. आणि त्या वाढतात.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध खाऊ नये. गरजेशिवाय औषधे घेऊ नयेत. कारण त्याने लिव्हर डॅमेज होऊ शकतो.