डोकेदुखी होत असेल तर काय उपाय करावेत ?

Created By: Atul Kamble

4 April 2026

बदलती जीवनशैली, जादा स्क्रिनटाईम, तणाव, झोपेची कमतरता यामुळे डोकेदुखीचा त्रास अनेकांना होत असतो. वारंवार डोकं दुखत असेल यापासून कसा बचाव करावा हे पाहूयात.

दररोज ७ ते ८ तास चांगली झोप घेणे गरजेचे आहे. झोप पूर्ण झाली नाही तर डोके जड होते. आणि डोके दुखू शकते. त्यामुळे झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करावी.

 शरीरात कमी पाणी गेल्याने डिहायड्रेशन देखील डोकेदुखीचे कारण बनते.त्यामुळे पुरेसे पाणी प्यावे.त्याने शरीर हायड्रेटेड राहाते. वेदनेपासून मुक्ती मिळते.

खूपवेळ मोबाईल वा लॅपटॉप पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो. त्यामुळे डोके दुखू शकते. त्यामुळे अधूनमधून ब्रेक घ्यावा

जास्त तणाव-चिंता डोके दुखीला आमंत्रण असते. स्वत:ला रिलॅक्स ठेवण्यासाठी योग, मेडिटेशन वा आवडीची एक्टीव्हीटी दिनश्चर्येत सामील करावी.

वेळेवर हेल्दी जेवण घेणे गरजेचे आहे. जास्त जंक फूड किंवा खूपवेळ उपाशी राहिल्याने डोके दुखू शकते. त्यामुळे संतुलित आहार घ्यावा.

रोज हलका-फुलका व्यायाम करावा. वा चालण्यास जावे. त्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. त्यामुळे मन ताजेतवाणे होऊन डोकेदुखीपासून आराम मिळतो.

( डिस्क्लेमर - वारंवार डोके दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा )