यकृत (लिव्हर) हा शरीरातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा अवयव आहे. शरीराला डिटॉक्सिफाय करण्यासाठी यकृत महत्त्वाचा आहे.

11 July 2025

शरीरातील ७०-८०% रोगप्रतिकारक पेशी आतड्यात असतात? यामुळे आरोग्यासाठी निरोगी आतडे आणि यकृत असणे किती महत्त्वाचे आहे, हे समजते.

सकाळी उठताच एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्या. हे केवळ शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढत नाही तर तुमचे चयापचय वाढवते.

सकाळी २० ते ३० मिनिटे योगा आणि धान्य करा. यामुळे पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था सक्रिय होतात. त्यामुळे पचन क्रिया चांगली होते.

सकाळचा नाश्ता जास्त हलका असावा. त्यात भरपूर फायबर असावे. यासाठी तुम्ही ओट्स, चिया सीड्स, ड्राय फ्रूट्स आणि ताजी फळे नाश्त्यात घेऊ शकता.

सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणे टाळा. सकाळी नाश्त्यानंतर चहा, कॉफी घेण्यास प्राधान्य द्या.

सकाळी प्रोसेस्ड फूड्स आणि साखरेचे पेय टाळा. यामुळे अनेकदा इन्सुलिनची पातळी वाढते. त्यामध्ये असे पदार्थ असतात ज्या आतड्यांना धोका पोहोचू शकतो.