पनीरमध्ये कोणते व्हिटॅमिन असतात? आरोग्यासाठी काय फायदे? जाणून घ्या
4 जून 2025
Created By: राकेश ठाकुर
पनीरमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फोरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक, सेलेनियम आणि हेल्थी फॅट्स, आयर्न, ओमेगा-3 फॅटी एसिड आणि अँटीऑक्सिडेंट्स असते.
पनीरमध्ये खूप सारे पोषक घटक असतात. आरोग्यवर्धक असल्याने फायदे होतात. कसं काय ते जाणून घ्या.
आहारतज्ज्ञ अनामिका गौर यांच्या मते, पनीरमधील बी12 मेंदू आणि मज्जासंस्थेसाठी लाभदायक आहे. लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत कते. तसेच अशक्तपणा, चक्कर येणे आणि स्मरणशक्तीच्या समस्या टाळते.
पनीरमधील व्हिटॅमिन डी शरीराला कॅल्शियम योग्यरित्या शोषण्यास मदत करते. यामुळे हाडे मजबूत होतात आमि रोगप्रतिकार शक्ती वाढते.
पनीरमधील व्हिटॅमिन ए मुळे डोळ्यांसाठी प्रभावी ठरतं. त्वचा निरोगी ठेवण्यास मदत होते.
पनीरमधील व्हिटॅमिन बी2 उर्जेची पातळी वाढवते. तसेच पचनक्रिया योग्य करते. त्वचा आणि केस निरोगी ठेवते.
पनीरमधील व्हिटॅमिन के2 हाडांपर्यंत कॅल्शियम पोहोचवण्यास मदत करते. हृदयाचा आरोग्यही चांगलं ठेवते.
दुधात मनुके भिजवून खाणं महिलांसाठी आरोग्यवर्धक, का ते जाणून घ्या