उन्हाळ्यात रोज एक ग्लास बेल फळाचा रस प्यायलाने काय होईल?

29 मे 2025

Created By:  राकेश ठाकुर

बेल फळाचा रसात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमीन बी, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, टॅनिन, फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. 

बेल फळाचा रस पोषक तत्त्वांनी भरलेला आहे.  उन्हाळ्यात रोज सकाळी प्यायल्याने आरोग्याचे अनेक फायदे होतात. चला जाणून घेऊयात.

आहारतज्ज्ञ परमजीत कौर यांनी सांगितलं की, बेल रसामध्ये आढळणारे टॅनिन आणि फायबरसारखे घटक पचन सुधारतात. बद्धकोष्ठता, गॅस, अपचनाच्या समस्या कमी होतात. 

बेल रसामुळे शरीराला थंडावा मिळतो. यामुळे उष्माघात टाळता येतो. उन्हाळ्यात शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यास मदत होते. 

बेल रसामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. संसर्गापासून संरक्षण होते.

बेल रसामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. यामुळे यकृत आणि मूत्रपिंडाचे आरोग्य सुधारते.

बेल रस शरीराला आतून थंड करते. यामुळे चेहऱ्यावर चमक येते. केसांच आरोग्यही सुधारते. 

पक्ष्यांना दाणे देताना या चुका करू नका, नाही तर होईल नुकसान!