किडनीच्या समस्येत कोणते
पदार्थ खाऊ नयेत...
Created By: Atul Kamble
15 March 2026
किडनीच्या त्रासात आहारावर लक्ष द्यावे लागते. चुकीचे पदार्थ खाल्ले तर किडनीवर दबाव येतो. त्यामुळे हे पदार्थ खाऊ नको
किडनी समस्येत जास्त मिठाचे पदार्थ खाऊ नयेत. चिप्स, पापड आणि लोणचे यात सोडीयम असते. त्याने ब्लड प्रेशर वाढून किडनीवर दबाव येतो.
प्रोसेस्ड आणि पॅकबंद पदार्थात सोडियम आणि प्रिजर्वेटिव जादा असतात. नूडल्स, पॅकेट सुप, बिस्कीटे, सॉसेज आणि रेडी टू इट पदार्थ किडनीवर गंभीर परिणाम करतात.
किडनी आजारात प्रोटीन जास्त खाऊ नये. रेड मिट, चिकन, अंडी जास्त प्रोटीन असते. त्याने किडनीवर जास्त प्रेशर येते.
किडनीच्या आजारात जास्त पोटॅशियम असलेली फळे खाऊ नयेत. केळी, बटाटा, टोमॅटो आणि पालक यात ते जास्त असते. पोटॅशियमने किडनीवर परिणाम होतो.
जादा साखर असलेले पदार्थ टाळावेत. मिठाई, केक, पेस्ट्री, कोल्ड ड्रींक यात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने किडनीची समस्या वाढते.
तळलेले पदार्थ, जंक फूडमध्ये मीठ, फॅट आणि कॅलरी जास्त असते. समोसे,भजी, बर्गर आणि फ्रेंच फ्राईज याच्या सेवनाने किडनीला त्रास होतो.
उन्हाळ्यात असा आहार करा आणि फिट राहा