पावसाळ्यात वातावरणात आद्रता जास्त असते. त्यामुळे बॅक्टरिया आणि फंगस सहज होतात.
26 June 2025
पावसाळ्याच्या या वातावरणात काही फळ खाल्यामुळे विषबाधा, पोट दुखणे, त्वचा विकार होण्याची शक्यता आहे.
डॉ. दीपक सुमन म्हणतात, कलिंगडमध्ये मुबलक पाणी असते. पावसाळ्यात ते लवकर खराब होऊ शकते. तसेच त्यात बॅक्टरिया येऊ शकते. त्यामुळे आजार होऊ शकतात.
खरबूज लवकर खराब होते. खरबूज कपताच संक्रमण होते. त्यामुळे पोट दुखणे, गॅस, अतिसार होण्याचा धोका आहे.
जांभूळ पावसाळी वातावरणात उघड्यावर विकले जातात. त्यामुळे कीड्यांचा संपर्क होतो. त्यातून पोटाचे आजार होऊ शकतात.
पावसाळ्यात बऱ्याचवेळी आंबे पूर्णपणे परिपक्व झालेले नसतात. तसेच बाहेरुन सडू लागतात. त्यामुळे पोट खराब होऊ शकते.
लिची पावसाळ्यात लवकर सडू लागते. त्याच्यावर फंगस येते. त्यामुळे पोट दुखणे आणि फूड पॉयजनिंग होते.
फळ नेहमी स्वच्छ धुवून खावे. खराब, कापलेले फळ खाऊ नये. ज्यामध्ये खूप पाणी असते (कलिंगड) असे फळ खाऊ नये. फळांचे ज्यूससुद्धा घरीच केलेले सेवन करा.
हे ही वाचा... दृष्ट लागल्यामुळे शुभ कार्य थांबतात का? प्रेमानंद महाराज यांनी दिले उत्तर