वजन करण्यासाठी डाएट फॉलो करताना सकाळी नाश्त्यात काय खाता हे महत्वाचे असते.अनेकजण चिप्स आणि कुकीजसारखे पदार्थ खातात.
भाजलेले मखाने आणि भिजवलेले चणे दोन्ही पोषक तत्वांनी पुरेपूर असल्याने आरोग्यदायी मानले जातात.वजन कमी करण्यासाठी कोणता पदार्थ फायदेशीर पाहूयात..
आहार तज्ज्ञ डॉ.प्रिया पालीवाल यांच्या मते मखान्यात कर्बोदके आणि फायबर भरपूर असते.तर चण्यात प्रथिने आणि लोहाचा सोर्स आहे.
तज्ज्ञाच्या मते मखाना हा कमी कॅलरी असलेला आणि हलका नाश्ता आहे. ज्यात फायबर जास्त असते. त्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते.त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ते उपयोगी आहे.
चणे हे वनस्पतीजन्य प्रथिनांचा चांगला स्रोत असून त्यात लोहासह अनेक खनिजे आहेत.शरीराला ऊर्जा आणि शक्ती देण्यासाठी तसेच स्नायूंना आधार देण्यासाठी ते उपयोगी ठरतात.
मखान्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखी खनिजे असतात.त्यामुळे हाडे मजबूत ठेवण्यासाठी हा आहार महत्वाचा आहे. तसेच पचनासाठी देखील ते फायदेशीर आहेत.
वजन कमी करायचे असेल त सकाळी नाश्त्यात भिजवलेले-मोड आलेले चणे खावेत.ते पचायला चांगले असतात.