Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
30 July 2026
Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर लोकांना अंडी, चिकन वा पनीरची आठवण येते.
परंतू तुम्ही शुद्ध शाकाहारी असाल तर घाबरण्याची काही गरज नाही.
अशा अनेक भाज्या आहेत ज्यात प्रोटीनचे प्रमाण जास्त असते.
चला तर पाहूयात कोणत्या भाजीत प्रोटीनचे प्रमाण जादा असते.
हिरवे मटार ( वाटाणे ) हे प्रोटीनयुक्त असतात.
एक कप मटारमध्ये जवळपास ८ ग्रॅम प्रोटीन आढळते.
हेल्थ फ्रीक्सची पहिली पसंद म्हटली जाणारी १०० ग्रॅम ब्रोकलीत सुमारे २.८ ग्रॅम प्रोटीन आढळते.
एक कप शिजवलेल्या पालकच्या भाजीत ५.३ ग्रॅम प्रोटीन असते.
१०० ग्रॅम कच्च्या फणसात १.८ ते २.५ ग्रॅम प्रोटीन असते.