अश्वगंधा कोणी खाऊ नये? जाणून घ्या

10 जुलै 2025

Created By:  राकेश ठाकुर

अश्वगंधा ही आयुर्वेदिक औषधी आहे. ताण कमी करण्यास, झोप सुधारण्यास आणि सहनशक्ती वाढवण्यास मदत करते. 

डॉ. सुभाष गिरी यांच्या मते, रक्तदाबाची औषधं घेत असाल तर अश्वगंधा तुमच्या औषधांचा इफेक्ट कमी करते. यामुळे रक्तदाब कमी अधिक होऊ शकतो. 

अश्वगंधा थायरॉईड संप्रेरकांवर परिणाम करू शकते. जर हायपर किंवा हायपोथायरॉइड रुग्णानी सल्ल्याशिवाय घेतले तर प्रकृती बिघडू शकते. 

तुम्हाला ल्युपस, संधिवात किंवा टाइप 1 मधुमेहसारखे ऑटोइम्युन आजार असतील अश्वगंधा त्यावर परिणाम करू शकते. 

गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी अश्वगंधा घेऊ नये. कारण यामुळे बाळाच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. 

शस्त्रक्रिया करणार असाल तर किमान दोन आठवडे अश्वगंधा घेणं थांबवा. कारण झोपेची औषधं किंवा एनेस्थिसियावर परिणाम करू शकते. 

अश्वगंधा आयुर्वेदिक असलं तरी प्रत्येकाच्या शरीरावर वेगवेगळा परिणाम होतो. त्यामुळे घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

घरात मनी प्लांट ठेवल्याने काय होतं?