'या' कारणांमुळे सतत जाणवतो थकवा, घ्या जाणून

19 May 2025

Created By: Shweta Walanj

पुरेशी झोप न मिळाल्यामुळे शरीर आणि मेंदूला विश्रांती मिळत नाही, त्यामुळे अशक्तपणा जाणवतो.

लोह , व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन डी यांची कमतरता असल्यास अशक्तपणा आणि थकवा जाणवतो.

शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यास थकवा जाणवतो आणि अशक्तपणा जाणवतो.

मानसिक तणाव, चिंता किंवा नैराश्यामुळेही शरीर थकलेलं वाटू शकतं.

फारशी हालचाल न करणे किंवा खूपच व्यायाम केल्यामुळे शरीर थकलेलं वाटू शकतं.