27 जून 2025
Created By: राकेश ठाकुर
व्हिटॅमिन डी हे चरबीत विरघळणारं व्हिटॅमिन आहे. यामुळे हाडं, स्नायू आणि रोग प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत होते. शरीरात कॅल्शियम शोषण्यासाठी आवश्यक आहे.
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडं कमकुवत होतात. स्नायू दुखतात किंवा थकल्यासारखं वाटतं. यामुळे प्रतिकारशक्ति कमी होते आणि केसही गळू शकतात.
अनेकदा उन्हात बाहेर पडल्यानंतरही व्हिटॅमिन डी वाढत नाही. कारण त्यासाठी उन्हात राहणं पुरेसं नाही. काही विशिष्ट कारणांमुळे प्रबाव कमी होऊ शकतो.
डॉ. सुभाष गिरी यांच्या मते, जर तुमची त्वचा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आली नाही तर व्हिटॅमिन डी तयार होणार नाही. कारण कपडे, स्कार्फ किंवा छत्रीमुळे याचा प्रभाव कमी होतो.
व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी सर्वोत्तम वेळ ही सकाळी 10 ते दुपारी 3 दरम्यान आहे. यावेळी यूव्हीबी किरणे सक्रिय असतात. सकाळी किंवा संध्याकाळी सूर्यप्रकाश फायदेशीर नाही.
गडद त्वचेच्या लोकांना व्हिटॅमिन डी तयार होण्यास जास्त वेळ लागतो. सनस्क्रिन लावून बाहेर पडले तर यूव्हीबी किरणे ब्लॉक होतात.
आहारात व्हिटॅमिन डी पुरेसं नसेल तर किडनी किंवा यकृताच्या समस्या वाढू शकतात. अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ला घेऊन पूरक आहार घ्या.