हिवाळ्यात अंजीर का ठरतात आरोग्यास उपयुक्त?

27 December 2025

Created By:  Shweta Walanj

अंजीर उष्ण गुणधर्माचे असल्यामुळे हिवाळ्यात शरीर गरम ठेवण्यास मदत होते.

अंजीरामध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते आणि पचन चांगले राहते.

नैसर्गिक साखर आणि पोषक घटक असल्यामुळे थकवा कमी होतो व शरीरात ऊर्जा येते.

कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियममुळे हाडे व दात मजबूत राहतात.

अँटीऑक्सिडंट्समुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, सर्दी-खोकल्यापासून संरक्षण मिळते.

अंजीरामध्ये लोह असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.