24 January 2024

हो! पुरुषांनाही होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर? ही लक्षणे दिसली तर सावधान...

Mahesh Pawar

स्तनाचा कर्करोग सामान्यतः स्त्रियांमध्ये दिसत असला तरी क्वचित प्रसंगी तो पुरुषांमध्ये देखील होतो.

स्तनाच्या कर्करोगाची केवळ 1% प्रकरणे पुरुषांमध्ये आढळतात.

महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं प्रमाण कमी आहे.

परंतु, गेल्या काही वर्षांपासून पुरुषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढताना पाहायला मिळतंय.

त्यामुळे फक्त महिलांनी नाही तर पुरूषांनीसुद्धा ‘Self Breast Examination' केलं पाहिजे.

Self-Breast Examination कसे करावे? याचे दोन प्रकार आहेत.

एक आरशासमोर उभं राहून किंवा झोपून आपण स्तनांची तपासणी करू शकतो.

स्तनांचा आकार, रंग बदलला आहे का हे पहाणे. स्तनांना सूज येणं, स्तन लाल होणे, व्रण आले आहेत का हे पाहणे.

स्तनाग्रांमधून पाणी, रक्त किंवा पिवळ्या रंगाचा पदार्थ येतो का याकडे लक्ष ठेवा.

हाताच्या तीन बोटांनी स्तनांच्या चारही बाजूला दाब देवून गाठ लागते की नाही ते पहावे.

एक मोरपीस घरात आणून तर बघा! कसं बदलेल तुमचं भाग्य...