मटणाच्या कोणत्या भागात असते सर्वात जास्त B-12, जाणून आश्चर्य वाटेल...
Created By: Atul Kamble
9 June 2026
एनसीबीआयच्या रिपोर्टनुसार व्हिटामिन्स B-12 एक वॉटर सॉल्युबल मायक्रोन्यूट्रिएंट आहे. याच्या कमतरतेने थकवा,कमजोरी तसेच केस-त्वचा डल होणे असे आजार होतात.लिव्हरशी याचे खास कनेक्शन आहे.
एका आरोग्यदायी व्यक्तीला रोज सुमारे 2.4 मायक्रोग्रॅम (MCG) व्हिटामिन्स B-12 ची गरज असते.आपले लिव्हर हे व्हिटामिन्स तयार करत नाही. याला स्टोअर करण्यात या अवयवाची मोठी भूमिका असते.शरीराचे 50 ते 90 टक्के B-12 लिव्हरमध्ये जमते.
बकरी किंवा मेंढीच्या लिव्हरमध्ये सर्वात जास्त B-12 आढळते.याला भारतात लोक बोली भाषेत कलेजी म्हणतात.100 ग्रॅम कलेजी 60 ते 90 मायक्रोग्रॅम व्हिटामिन्स बी-12 असते.रोजच्या आहारासाठी हा बेस्ट सोर्स आहे.
बातमीनुसार बकरे आणि मेंढीच्या लिव्हरमध्ये नव्हे तर किडनीतही व्हिटामिन्स B-12 असते.असे म्हणतात 100 ग्रॅममध्ये सुमारे 20ते 25 मायक्रोग्रॅम B-12 असते.
व्हिटामिन्स B-12 ला नैसर्गिकपणे वाढवायचे असेल तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा मटण लिव्हर आणि इतर भाग खाऊन कमतरता पूर्ण केली जाऊ शकते.कलेजी भाजून खाणे फायद्याचे ठरते.
जे नॉनव्हेज खात नाहीत. त्यांच्यासाठी B-12 ची कमतरता पूर्ण करणे अवघड असते.यासाठी फोर्टिफाईड फूड खायला हवेत.यासारख्या पदार्थात B-12 स्वतंत्रपणे समाविष्ठ केलेले असते.
व्हेजेटेरियन लोक डेअर प्रोडक्ट दूध, दही, चीज, फोर्टीफाईड फ्लोर आणि B-12 सप्लीमेंट्सचा समावेश करु शकतात.डेअर प्रोडक्ट्समध्ये काही प्रमाणात बी-12 असते.