20 नोव्हेंबर 2026
Created By: Bhakti Gothankar
नैसर्गिक बाऊन्स आणि व्हॉल्यूम केस धुतल्यानंतर किंवा बांधल्यानंतर एकदा चपटे दिसू लागतात. वारंवार स्ट्रेटनर किंवा कर्लर वापरण्याऐवजी काही सोप्या ट्रिक्सच्या मदतीने केसांना नैसर्गिक बाऊन्स आणि व्हॉल्यूम देता येतो.
केसांची पार्टिंग बदला नेहमी एकाच बाजूने केसांची पार्टिंग केल्याने मुळं त्याच दिशेने बसतात. केस चपटे दिसू लागतात. त्यामुळे केसांची पार्टिंग बदला यामुळे केसांना लिफ्ट मिळते.
रात्री सैल वेणी किंवा बन घाला झोपण्यापूर्वी केसांचा बन किंवा सैल वेणी घाला. केस खूप घट्ट बांधू नका. सैल केस बांधल्याने सकाळी केसांना मस्त बाऊन्स मिळेल.
ड्राय शॅम्पूचा वापर करा ड्राय शॅम्पू मुळांवर लावल्याने केसांचा चिकटपणा गायब होतो. मुळांजवळ थोडासा लाऊन मसाज केल्याने टेक्चर आणि व्हॉल्यूम मिळतो.
केसांना हलक टिझ करा कंगव्याच्या मदतीने क्राऊन एरियातील केस हलकेच टिझ करा. जास्त जोरात ओढू नका. त्यामुळे केसांना मस्त बाऊन्स मिळेल.
स्कॅल्प मसाज करा दररोज काही मिनिटे बोटांच्या टोकांनी स्कॅल्पला हलका मसाज करा. यामुळे स्कॅल्पला आराम मिळतो आणि केसांच्या मुळांना हलकं लिफ्ट मिळतं.
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)