17 ऑक्टोबर 2026
Created By: Sunil Late
केळी हे जगातील सर्वात जुने फळ मानले जाते. हे फळ बहुतांश देशांमध्ये आढळते. मात्र त्याचे प्रकार सर्वत्र भिन्न आहेत. –
केळीचा जन्म आग्नेय आशियातील मलेशिया, इंडोनेशिया किंवा फिलीपिन्सच्या जंगलात झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येते.
जगभरात केळीच्या १००० पेक्षा जास्त जाती आहेत. या जाती ५० गटांमध्ये विभागल्या जातात, यापैकी बऱ्याच जाती खूप गोड आहेत.
भारतामध्येच केळीच्या ३३ जाती आढळतात. यापैकी १२ प्रकार अतिशय चवदार मानले जातात.
या स्वादिष्ट प्रकारांमध्ये वेलची किंवा येलक्की केळीचाही समावेश होतो. ही लहान आकाराची केळी अतिशय गोड आणि पौष्टिक गुणधर्मांनी परिपूर्ण मानली जाते.
तसेच, दक्षिण भारत, बिहार आणि झारखंडमध्ये रस्थाली केळीची लागवड केली जाते. हे मध्यम आकाराचे केळे आहे. –