25 January 2024
Mahesh Pawar
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाढता विस्तार त्याला प्रगत आणि सक्षम बनवत आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स आज नाही तर उद्या जगाचा ताबा घेईल असे लोकांना वाटते.
हा धोका लक्षात घेता IMF (International Monetary Fund) ने मोठा इशारा दिला आहे.
IMF चा असा अंदाज आहे की AI मुळे जगातील 40 टक्के नोकऱ्या धोक्यात आहेत.
कारण, ब्रिटनसारख्या देशात त्याचा परिणाम ६० टक्के नोकऱ्यांवर होत आहे.
येथे लोकांना पगार कपात आणि टाळेबंदीचा धोका निर्माण झालाय.
जगभरात AI मुळे संपत्तीची असमानता वाढण्याची शक्यता आहे.
इतकेच नाही तर या तंत्रज्ञानामुळे देशांमधील असमानता आणखीनच वाढू शकते.