जगातील असा देश जिथे भीक मागण्यासाठी सरकारकडून घ्यावं लागतं लायसन्स, अन् ओळखपत्र

19 मार्च 2025

Created By : मयुरी सर्जेराव

काहीवेळा गरिबीमुळे लोकांना स्वतःचे पोट भरण्यासाठी भीक मागावी लागते

 पण  जगात असा एक देश आहे जिथे भीक मागण्यासाठी देखील परवाना घ्यावा लागतो

युरोपमध्ये स्वीडन नावाचा एक देश आहे, जिथे एस्किल्स्टुना हे एक ठिकाण आहे. इथे लोकांना भीक मागण्यासाठी परवाना घ्यावा लागतो

काही वर्षांपूर्वी येथील भिकाऱ्यांसाठी परवाना शुल्क अनिवार्य करण्यात आलं आहे

इथे जर एखाद्याला भीक मागायची असेल तर  त्याला आधी परवानगी घ्यावी लागतो

2019 मध्ये एस्किल्स्टुनामध्ये हा नियम लागू करण्यात आला. या नियमानुसार, भिकाऱ्याला वैध ओळखपत्रही मिळते

या लोकांना 250 स्वीडिश क्रोना खर्च करावे लागतात. यामागचा हेतू आहे की भीक मागण्याचे प्रमाण कमी होऊ शकतं

एस्किलस्टुनाचे अधिकारी म्हणतात की परवाना प्रक्रियेमुळे शहरात किती भिकारी आहेत याचा अंदाज घेण्यास मदत होते. यामुळे भिकाऱ्यांना आवश्यक वस्तू पुरवणे देखील सोपे होते