रेल्वेने रोज कोट्यवधी नागरिक प्रवास करतात. त्यांनी रेल्वे रुळ दोन ट्रॅक असणारेच पाहिले आहेत.
5 March 2025
सामान्यता रेल्वेला धावण्यासाठी दोन ट्रॅक लागतात. पण बांगलादेशमध्ये ट्रेन धावण्यासाठी ३ ट्रॅक असतात.
बांगलादेशमध्ये रेल्वेला ३ ठिकाणी चाक असतात का? असा प्रश्न पडला असेल. कारण एकाच वेळी ट्रेन कशी तीन ट्रॅकवर धावू शकते.
खरंतर बांगलादेशातील हा विषय रेल्वे ट्रॅकवरील गेजचा आहे. रेल्वे ट्रॅक हे नेहमी गेजनुसार तयार केले जातात.
बांगलादेशातील रेल्वेसाठी ड्युअल गेजचा वापर केला जातो. त्यामुळे तीन ट्रॅकसह रेल्वे ट्रॅक वापरला जातो.
बांगलादेशात पूर्वी मीटरगेजचा वापर केला जात होता. ब्रॉडगेजनंतर आले.
मीटरगेजचे ब्रॉडगेजमध्ये रुपातंर करण्याचा खर्च खूप जास्त होता. तसेच बांगलादेश सरकारला देशभर पसरलेले मीटरगेजची रेल्वेही बंद करायचे नव्हती.
बांगलादेशने दुहेरी रेल्वे ट्रॅक बसवण्याचा निर्णय घेतला. यामुळे एकाच ट्रॅकवर दोन वेगवेगळ्या गेजच्या गाड्या चालवता येते . म्हणूनच त्याला मिश्र गेज असेही म्हणतात.
दुहेरी गेज ब्रॉडगेज आणि मीटर गेज दोन्ही एकत्र करून तयार केले आहे. यामुळेच आज बांगलादेशात ब्रॉडगेज आणि मीटरगेज गाड्या एकाच ट्रॅकवरून धावतात.