ग्लॅमर फक्त बॉलीवूड कलाकारांकडे नाही. देशातील काही महिला IAS आणि IPS अधिकाऱ्यांचे चांगले फॉलोवर्स आहेत.
4 March 2025
आयपीएस अंशिका वर्मा या दक्षिण बरेलीत अतिरिक्त पोलीस अधीक्षक आहेत. अंशिका या प्रगागराजच्या रहिवाशी आहेत. त्यांनी इलेक्ट्रोनिक्स अँड कम्युनिकेशन्समधून बीटेक केले.
4 March 2025
आयएएस प्रियंका गोयल दिल्लीच्या आहेत. त्यांनी यूपीएससीच्या शेवटच्या अटेंप्टमध्ये यश मिळवले. सन 2022 मध्ये त्यांनी ऑल इंडिया 369 रँक मिळाली. त्यांनी बीकॉमची पदवी दिल्लीतून घेतली आहे.
4 March 2025
IPS नवजोत सिमी बिहारमधील पटना येथे पोलीस अधीक्षक आहेत. 1987 मध्ये जन्मलेल्या सिमी या पंजाबमधील गुरुदासपूर येथील आहेत. त्यांनी बीडीएसची पदवी घेतली. 2017 मध्ये पहिल्या अटेंप्टमध्ये त्यांनी यूपीएससी क्रॅक केली.
4 March 2025
आयएएस परी बिश्नोई या 2023 मध्ये चर्चेत आल्या. 2019 मध्ये यूपीएससी क्रॅक करुन त्या आयएएस बनल्या. त्या राजस्थानमधील बीकानेर येथील आहेत.
2020 बॅचच्या आयएएस अधिकारी सरजना यादव सध्या मध्य प्रदेशमध्ये केडरमध्ये आहेत. त्या जबलपूरमध्ये अपर जिल्हाधिकारी आहेत. त्यांनी तिसऱ्या अटेंप्टमध्ये यूपीएससी क्रॅक केली होती.
स्मिता सभरवाल तेलंगाना कॅडरच्या 2001 बॅचच्या आयएएस अधिकारी आहे. सध्या त्या युवा विकास, पर्यटन विभागाच्या सचिव आहेत. वयाच्या 22 वर्षी त्या IAS बनल्या होत्या.