पुतिन यांच्या रशियात मुस्लिमांची संख्या नेमकी किती ?

4 DEC 2025

Created By: Atul Kamble

 रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन ४ आणि ५  डिसेंबर असे दोन दिवस भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. रशिया हे ख्रिश्चन राष्ट्र असले तरी तेथे किती मुस्लीम आहेत हे पाहूयात

 रशियात मुस्लीमांची संख्या १४ ते १६ दशलक्ष असून जी एकूण लोकसंख्येच्या ११ टक्के आहे.

 युरोपातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेल्या देशात रशियाचा सर्वात पहिला आहे. रशियात सुमारे १.४ ते २.५ कोटी मुस्लीम राहातात.

 काही २०१७ च्या रिपोर्टनुसार रशियात १.४ कोटी ( १० टक्के ) मुसलमान रहातात. तर अलिकडच्या अंदाजानुसार ही संख्या २.५ कोटी ( लोकसंख्येच्या ११ टक्के ) पर्यंत जाते.

रशियाच्या उत्तर काकेशस आणि वोल्गा बेसिन क्षेत्रात मुसलमान राहातात. या मुस्लीम लोकसंख्येत तातार,बश्कीर आणि चेचेन सारखे जातसमुह आहेत.

 रशियाच्या काही शहरात मुसलमानांची संख्या अधिक आहे. कझान, तातारस्थान शहरात मुस्लीमांची संख्या जास्त आहे.

रशियात मुस्लीम संख्या सातत्याने वाढत आहे. मुस्लीम समुदायातील उच्च जन्म दर आणि मध्य आशियातील मुस्लीम स्थलांतरीत होत असल्याने ही संख्या वाढत आहेत.

काही अंदाजानुसार साल २०३४ पर्यंत रशियाच्या लोकसंख्येत मुस्लीमाचा वाटा ३० टक्क्यांपर्यंत जाणार आहे.