एके काळी उंदरालाही घाबरायचे रशियन प्रेसिडन्ट पुतीन !

Created By: Atul Kamble

 15 FEB 2026

 व्लादिमीर पुतीन यांचं बालपण लेनिनग्राडच्या जुन्या अपार्टमेंटमध्ये गेलंय

त्यांनी त्यांच्या आत्मकथेत लिहीलंय की तेथे उंदीर -घुशींचे साम्राज्य होते.

पुतीन यांना इमारतीच्या जिन्यांवरुन जाताना नेहमी उंदरांची भीती वाटायची

 एकदा लहानपणी त्यांनी एका उंदराला धाडस करुन एका कोपऱ्यात घेरले.

उंदराला मार्ग मिळाला नाही तर तो थेट लहानग्या पुतीन यांच्यावर धावून आला

 या घटनेतून त्यांना धडा मिळाला की कोणताही जीव लहान किंवा कमजोर असला तरी जेव्हा तो घेरला जातो तेव्हा पलटकर हल्ला करतो.

पुतीन यांच्या हा बालपणाचा अनुभव त्यांचे जीवन आणि नेतृत्व दोन्हींवर पडला.

 ते म्हणाले की खरोखरच त्यामुळे ते घाबरले,कारण त्या उंदराची आक्रमकता अनपेक्षित होती.

पुतीन आज देखील त्या घटनेला आपल्या बालपणाचा एक धडा मानतात.