ना भिती, ना चिंता, जगातील हे पाच देश महिलांसाठी एकदम सुरक्षित, एकट्याने फिरू शकता

8 मार्च 2026

Created By:  Soneshwar Patil

एकट्याने प्रवास करणे हे महिलांसाठी आत्मविश्वास वाढवणारे आणि साहसी अनुभव देणारे मानले जाते.

पण जगातील हे पाच देश महिला प्रवाशांसाठी अत्यंत सुरक्षित मानले जातात.

या यादीत Iceland हा देश पुन्हा एकदा अव्वल ठरला आहे. येथे गुन्हेगारीचे प्रमाण अत्यंत कमी असून स्थानिक लोकही मैत्रीपूर्ण आहेत.

New Zealand हा साहसी प्रवास आवडणाऱ्या महिलांसाठी उत्तम पर्याय मानला जातो. येथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विश्वासार्ह आहे.

याशिवाय Finland हा देश सुरक्षितता, स्वच्छता आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो. येथील सांस्कृतिक वातावरण आणि शांत तलाव पर्यटकांना खास अनुभव देतात.

Canada देखील महिलांसाठी सुरक्षित प्रवासाचे ठिकाण मानले जाते. Vancouver आणि Toronto सारख्या शहरांमध्ये तुम्ही निर्धास्तपणे फिरू शकता.

तसेच Switzerland हा देशही सुरक्षित देश आहे. निसर्गरम्य तलाव आणि सुंदर पर्वतरांगा यामुळे महिला पर्यटकांसाठी हा देश आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो.