इंग्रजांनी 1947 मध्ये भारताला स्वातंत्र दिले. परंतु देशाच्या फाळणीवर शिक्कामोर्तब केले.

3 March 2025

भारतातून वेगळ्या झालेल्या भूभागाला पाकिस्तान हे नाव देण्यात आले. त्या राष्ट्राची निर्मितीचे श्रेय मोहम्मद अली जिन्ना यांना दिले जाते. 

पाकिस्तान हे नाव मोहम्मद अली जिन्ना यांनी दिले नाही. त्यांच्यापूर्वी धर्माच्या आधारावर मुस्लीम देश व्हावा, अशी मागणी एका व्यक्तीने केली.

चौधरी रहमत अली यांनी 1933 मध्ये पाकिस्तान निर्मितीची योजना मांडली. चौधरी रहमत अली यांचा मुस्लिम गुर्जर परिवारात जन्म झाला होता.

दक्षिण अशियात एक वेगळे मुस्लीम राष्ट्र असावे आणि त्याचे नाव पाकिस्तान असावे, असे त्यांनी सर्वप्रथम म्हटले होते.

28 जानेवारी, 1933 रोजी पॅम्फलेट 'नाउ अँड नेव्हर' मध्ये म्हटले की, तीन कोटी मुस्लिमांची इच्छा आहे की, त्यांच्यासाठी स्वतंत्र राष्ट्र असावे. 

पाकिस्तानचा अर्थ पवित्र भूमी होतो. हा फारसी आणि उर्दू शब्द आहे. पाकचा अर्थ पवित्र, शुद्ध आणि स्तान म्हणजे भूमी.