10 ऑक्टोबर 2026
Created By: Bhakti Gothankar
अरबी समुद्राच्या लाटांमध्ये उभा असलेला मुरूड- जंजिरा किल्ला म्हणजे कोकणच्या सागरी इतिहासाची साक्ष देणारा भव्य जलदुर्ग! मजबूत तटबंदी, लपलेलं प्रवेशव्दार, प्रसिद्ध तोफा आणि गोड्या पाण्याचे तलाव यांमुळे या किल्ल्याला वेगळं महत्त्व आहे.
समुद्राच्या मध्यभागी उभा हा जलदुर्ग मुरूड मध्ये अरबी समुद्रात जंजिरा किल्ला उभा आहे. चारही बाजूंनी समुद्राने वेढलेल्या या किल्ल्याचं स्थान त्याच्या संरक्षणासाठी महत्त्वाचं होतं किनाऱ्यावरून दिसणारी त्याची भक्कम तटबंदी आजही पर्यटकांच लक्ष वेधून घेते.
किल्ल्याचा इतिहास महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या माहितीनुसार, कोळी समाजाने समुद्री लुटारूंपासून वाचण्यासाठी या खडकावर लाकडी बांधकाम केलं.पुढे दगडी बांधकाम करण्यात आलं. त्यानंतर किल्ल्याचं महत्त्व वाढलं
प्रवेशव्दार सहज नजरेस पडत नाही जंजिरा किल्ल्याचं मुख्य प्रवेशव्दार राजापूरीच्या किनाऱ्याच्या दिशेला आहे. किल्ल्याची बाह्यरचना अशी आहे की दुरून पाहताना प्रवेशद्वार लक्षात येत नाही.
तटबंदी आणि बुरूजांची मजबूत रचना किल्ल्यांची उंच दगडी तटबंदी, तिच्यावरचे बुरूज हे त्याच्या संरक्षण व्यवस्थेचे महत्त्वाचे भाग आहेत. पर्यटन विभागाच्या माहितीनुसार या किल्ल्यावर 26 तोफधारी बुरूज आजही शाबूत आहेत
किल्ल्यावरील गोड्या पाण्याचे तलाव समुद्राच्या मध्यभागी असूनही किल्ल्यात गोड्या पाण्याचे तलाव आहेत.भले मोठे तलाव हे या किल्लाचे वैशिष्ट्य आहे.
मराठ्यांनाही जिंकता आला नाही हा किल्ला जंजिरा किल्ला ताब्यात घेण्यासाठी मराठ्यांसह अनेक सत्तांनी प्रयत्न केले. मात्र त्यांना किल्ला जिंकण्यात यश आलं नाही. समुद्रातील स्थान आणि मजबूत संरक्षणव्यवस्था यामुळे जंजिरा दीर्घकाळ अजिंक्य राहिला.
जंजिऱ्याला कसे पोहोचयाचे? रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाने सहज पोहोचण्यायोग्य आहे. या किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी अलिबाग गाठा तिथून मुरूडला जाण्यासाठी बस आणि मग राजापुरी जेट्टीवरून बोटीने प्रवास करावा लागतो.