7 नोव्हेंबर 2026
Created By: Sunil Late
दिवाळीत चकली, करंजी, लाडू अशा फराळाचा आस्वाद घेताना ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. हे 7 घरगुती उपाय जाणून घ्या.
एक चमचा जिरे पाण्यात उकळून ते पाणी प्या. जिऱ्याच्या पाण्यामुळे काहींना पचनाच्या त्रासात आराम मिळू शकतो.
तेलकट-तुपकट फराळ खाल्ल्यानंतर पोट जड वाटत असल्यास आल्याचा छोटा तुकडा सैंधव मिठासोबत चघळण्याचा उपाय सांगितला जातो.
फराळ खाल्ल्यानंतर थोडी बडीशेप आणि ओवा चघळण्याचा घरगुती उपाय करता येतो. मात्र ॲसिडिटीवर याचा त्वरित परिणाम होईलच असे नाही.
सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून पिण्याचा उपाय सांगितला जातो. मात्र ॲसिडिटीचा त्रास असल्यास लिंबामुळे काहींची जळजळ वाढू शकते.
पुदिन्याची पाने पाण्यात उकळून ते पाणी पिण्याचा उपायही सांगितला जातो. मात्र काही लोकांमध्ये पुदिन्यामुळे ॲसिड रिफ्लक्स वाढू शकतो.
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)