शाकाहारी सुपचे भन्नाट प्रकार जे थंडीत शरीराला उबदार करतील...

6 november 2025

Created By: Atul Kamble

थंडीत गरमागरम सुप पिण्याचा आनंद काय असतो आहाहा..शाकाहारी सुप देखील शरीराला गरम राखतात..

बाजरी सुपरफूड आहे.बाजरीचे सुप बनवण्यासाठी बाजरी पावडर,तांदुळ, काळी मिरी, आणि मिठाची गरज लागेल.

गाजराचे सुप थंडीत चांगले असते. यात आले आणि काळी मिरी टाकून इम्युनिटी देखील वाढते. गाजरात विटामिन्स ए अशते. डोळ्यांना ते फायद्याचे असते. यात लसूण टाकणे विसरु नका.

थंडीत चिकन सुपनंतर टॉमेटो सुपला सर्वाधिक पसंद केले जाते. यात लसूण टाकल्याने शरीरास आतून उब मिळते. टोमॅटो सूप चवीला उत्तम असते.

 ब्रोकली आणि स्वीट कॉर्न सुप - ब्रोकलीत आयर्न, फायबर आणि  कॅल्शियम असते.ब्रोकलीचे सुप बनवताना त्यात काळी मिरी,लसूण आणि स्वीट कॉर्न टाकायला विसरू नये. 

मूग डाळीपासून तयार सूप देखील थंडीत उष्णता देते. यात लसूण, आले आणि हळद घालण्यास विसरु नये. डायजेशन नीट राखण्यासाठी यात काळे मीट जरुर टाकावे.

मशरुम हे सुपरफूड असून त्याच्या सूपही चांगले लागते. यात पालेच्या भाज्या टाकून तयार केल्यास एनर्जी मिळते.