6 november 2025
Created By: Atul Kamble
ब्लॅक मांबा आणि किंग कोब्रा जगातील दोन सर्वात खतरनाक विषारी साप आहेत.
परंतू तुम्हाला माहिती आहे की या दोघात कोण जास्त विषारी आहे. यांची खासियत काय आहे ?
ब्लॅक मांबा खूप जास्त खतरनाक आणि विषारी आहे. हा चावला तर माणसाचे वाचणे कठीण असते.
हा साप १४ फूटांपर्यंत लांब असू शकतात.तो १२.५ मैल प्रति तास वेगाने सरपटत प्रवास करु शकतो.
ब्लॅक मांबाचे विष न्यूरोटॉक्सिक असते. ते वेगाने नसा आणि स्नायूंना निष्क्रीय करते.
किंग कोब्राही साधा साप नाही. हा जगातला सर्वात लांब विषारी साप आहे. हा १८ फूटांपर्यंत लांबीला असू शकतो.
द.पूर्व आशियातील काही भागात आढळणाऱ्या किंग कोब्रा याचे वजन १० पौंडाहून अधिक असू शकते.
किंग कोब्रा त्याचा विशाल फणा पसरुन फुत्काराचा आवाज काढून समोरच्याला घाबरवतो.
किंग कोब्रा याचे विष न्यूरोटॉक्सिक आणि कॉर्डिओटॉक्सिक असते. परंतू ब्लॅक मांबाच्या तुलनेत कमी ताकदीचे असते.
ब्लॅक मांबाचे विष भिनले तर १०० टक्के प्रकरणात मृत्यू होतो.तर किंग कोब्राचे विष घातक असले तरी माणूस वाचण्याची शक्यता अधिक असते.