आरोग्यास लाभदायक मेथी पराठे बनवण्यासाठी खास टिप्स
07 July 2025
Created By: Shweta Walanj
१ कप गहू पीठ, १ कप चिरलेली मेथी, १ टीस्पून हळद, टीस्पून तिखट, मीठ चवीनुसार, टीस्पून जिरे, आणि थोडं तेल घ्या
गव्हाच्या पिठात मेथीची पाने, हळद, तिखट, मीठ, जिरे आणि थोडं तेल टाका. गरजेनुसार पाणी घालून मऊ पीठ मळा
मळलेलं पीठ १०-१५ मिनिटं झाकून ठेवा
पीठाचे छोटे गोळ्या करून पराठ्यासारख्या लाटून घ्या
गरम तव्यावर लाटलेला पराठा ठेवून दोन्ही बाजूंनी थोडं तेल लावून खरपूस शेकून घ्या
पराठा दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजा
गरमागरम मेथी पराठा लोणचं, दही किंवा चटणीसोबत सर्व्ह करा
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...