हृदयाच्या आरोग्यासाठी या 5 फळांचा आहारात समावेश करा
Created By: Atul Kamble
1 June 2026
हृदयाच्या आरोग्यासाठी संतुलित आहार खूप गरजेचा असतो. फळातील फायबर, एंटीऑक्सीडेंट आणि व्हिटामिन हृदयासाठी चांगले मानले जातात.चला तर ही फळे कोणती ते पाहूयात..
सफरचंदात फायबर आणि एंटीऑक्सीडेंट आढळतात.नियमित सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात मदत मिळते.हृदयाचे आरोग्य राखण्यात मदत मिळते.
डाळिंबात एंटीऑक्सीडेंट भरपूर असते. हे ब्लड वेसल्सना आरोग्यदायी राखण्यास आणि ब्लड फ्लो चांगला राखण्यास तसेच हृदयाला हेल्दी करण्यास मदत करते.
संत्र्यात व्हिटामिन्स सी आणि फायबर असते.शरीरासह आरोग्याला पोषण देण्यास मदत करते.तसेच सूज कमी करण्यासही संत्री मदत करतात.
केळात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. हे ब्लड प्रेशर संतुलित राखते. हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करते.
स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी आणि अन्य बेरीजमध्ये एंटीऑक्सीडेंट तत्व भरपूर असते. हे ऑक्सीडेटिव्ह तणाव कमी करणे आणि हृदयाला आरोग्यदायी राखण्यास मदत करते.
फळांचे सेवन करण्यासोबत नियमित व्यायाम, पुरेशी झोप,तणाव नियंत्रण आणि संतुलित डाएट देखील गरजेचे असते. चांगली लाईफस्टाईल हृदयाला दीर्घकाळ आरोग्यदायी आणि मजबूत राखते.