Created By: Atul Kamble

 बद्धकोष्ठता दूर करायची असेल तर आहारात या भाज्यांचा समावेश करा

Created By: Atul Kamble

1 June 2026

 बद्धकोष्ठता ही सर्वसामान्य अपचनाची समस्या आहे.ज्यात शौचाला जाताना त्रास होतो.फायबर, पाण्याची कमतरता, खराब खानपाणाची सवय यामुळे हा त्रास होऊ शकतो.यातून बरे व्हायचे असल्यास कोणत्या भाज्या खायच्या ते पाहूयात..

पालक भाजीत फायबर आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. ते आतड्यांची कार्यक्षमता चांगली करते आणि मैला नरम करुन तो बाहेर टाकण्यास मदत करते.

 दूधी भोपळा हलका आणि सहज पचणारा पदार्थ. यात पाणी जास्त असल्याने शरीराला हायड्रेट राखण्यास तसेच पचन यंत्रणेला एक्टीव्ह रुपाने काम करण्यास मदत करते.

 भेंडीत फायबर आढळते,यातील चिकटपणा आतड्यांना लुब्रिकेट करण्यास मदत करतो.त्यामुळे मल त्यागण्यास मदत होऊन बद्धकोष्ठतेत आराम मिळतो.

 कोबीच्या भाजीतही फायबर जास्त असते.याच्या नियमित सेवनाने पचन यंत्रणा नीट होऊन आतड्यांची सफाई चांगली होते.

गाजरातही फायबर आणि अनेक पोषक तत्वे असतात.सलाड वा भाजीच्या रुपात खाल्ल्याने पचन यंत्रणा चांगली होते. आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत होते.

ब्रोकलीत फायबर आणि एंटीऑक्सीडेंट्स भरपूर असते.आतड्यांचे आरोग्य चांगले राखण्यात ही भाजी मदत करते. नियमित मल त्यागण्यास प्रोत्साहन देऊन बद्धकोष्ठतेपासून आराम देते.