भाजणी पीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, आले, हळद, मीठ, थोडं तूप किंवा तेल मिक्स करा
थोडं थोडं पाणी घालत एकसारखं, मध्यमसर घट्ट अशा प्रकारचं पीठ मळा
एका प्लास्टिकच्या पिशवीला किंवा कोरड्या कापडाला थोडं पाणी लावून त्यावर थोडं पीठ घेऊन बोटांनी थापून पातळ थालीपीठ तयार करा. मध्ये एक भोक करा म्हणजे वाफ बाहेर जाईल.
गरम तव्यावर थोडं तेल सोडून थालीपीठ टाका. झाकण ठेवून मध्यम आचेवर भाजा.
एक बाजू खरपूस भाजल्यावर पलटवा आणि दुसऱ्या बाजूनेही भाजा. थोडं तेल कडेने सोडायला विसरू नका.
गरम गरम थालीपीठ लोणचं, दही किंवा लसणाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.